घाटकोपर (मुंबई) येथे पोलिसांनी ध्वनीवर्धक जप्त करून मनसेच्या विभागप्रमुखांना घेतले कह्यात !
मशिदींवरील भोंग्यांना प्रत्युत्तर म्हणून भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आवाहन !
- मशिदींवरील अवैध भोंगे काढण्याचे धाडस कोणतेही सरकार करत नाही, हे लक्षात घ्या !
- मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणारे पोलीस हिंदूंनी लावलेल्या ध्वनीवर्धकांवर मात्र तत्परतेने कारवाई करतात. हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्यावर कारवाई करणारे पोलीस अल्पसंख्यांकांच्या विरोधात कारवाई करायला का कचरतात ? यालाच सर्वधर्मसमभाव म्हणतात का ? असा दुजाभाव करणाऱ्या पोलिसांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारावा !
मुंबई – गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क येथे मनसेच्या सार्वजनिक सभेत राज ठाकरे यांनी ‘मशिदींवरील भोंगे काढले नाहीत, तर मंदिरांवर दुप्पट क्षमतेचे ध्वनीवर्धक लावून ‘हनुमान चालिसा लावा’, असे आवाहन केले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर घाटकोपर (पश्चिम) येथील चिरानगर येथे मनसेच्या कार्यालयावर चांदिवलीचे मनसेचे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांनी ध्वनीवर्धकावर हनुमान चालिसा लावली; मात्र पोलिसांनी हे ध्वनीवर्धक काढून घेतले आहेत, तसेच भानुशाली यांनाही कह्यात घेतले आहे.
#WATCH ‘Hanuman Chalisa’ being played from loudspeakers at the Maharashtra Navnirman Sena office in Mumbai’s Ghatkopar
MNS Chief Raj Thackeray yesterday said, “I am warning now…Remove loudspeakers or else will put loudspeakers in front of the mosque and play Hanuman Chalisa.” pic.twitter.com/nERn23Vg7M
— ANI (@ANI) April 3, 2022
सकाळी आणि सायंकाळी ‘हनुमान चालिसा’ लावणार म्हणजे लावणार ! – महेंद्र भानुशाली, मनसे
सन्माननीय राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन मी करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन म्हणून मी येथील मनसेच्या शाखेवर ध्वनीवर्धक लावून हनुमान चालिसा लावली आहे. मी माझ्या धर्मानुसार आरती करत आहे. पोलीस आणि प्रशासन यांनी मला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तरीही सकाळ आणि सायंकाळी प्रत्येकी २ घंटे मी हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच. (अनेकदा तक्रारी करूनही पोलीस मशिदींवरील भोंगे हटवत नाहीत आणि त्यांवर कारवाईही करत नाहीत. त्यामुळे हिंदूंना नाईलाजाने ही कृती करावी लागत आहे ! – संपादक)