(म्हणे) ‘मुंबऱ्यात काही शतके हिंदु-मुसलमान प्रेमाने रहात असल्याने मुंबऱ्याला अपकीर्त करू नका !’
मुसलमानप्रेमाचा पुळका आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट !
ठाणे – राज ठाकरे यांनी मुंबई याविषयी कारण नसतांना जातीयवादी विधान केले. माझे त्यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासमवेत मुंबऱ्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला, तरी मी राजकारण सोडून देईन. मुंबऱ्यात काही शतके हिंदु-मुसलमान प्रेमाने रहातात. त्यामुळे मुंबऱ्याला अपकीर्त करू नका, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे केले.
राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले.माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की,त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे.दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल.
मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात
मुंब्र्याला बदनाम करू नका— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 2, 2022
मुंबई, तसेच मुंब्रा येथील झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार चालू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्यासह मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याअनुषंगाने आव्हाड यांनी वरील विधान केले.