उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे धडे देण्यात येणार ! – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह
प्रत्येक नगरपालिकेमध्ये एक गोशाळा असणार !
बरेली (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील मदरशांतील शिक्षणाविषयीचा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार असेल. यात राष्ट्रवादाच्या संदर्भातील धडे असतील. यात आतंकवादाची कोणतीही गोष्ट नसेल. तसेच व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल, अशी माहिती राज्येचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली. पशूपालन विभागाचे मंत्री असणार्या सिंह यांनी राज्यातील प्रत्येक नगरपालिकेकडे न्यूनतम एक गोशाळा असेल जेथे गायींची देखभाल केली जाईल. या गायींचे दूध आणि शेण यांची विक्री करून त्यातून गोशाळांवर खर्च केला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. ते येथील ‘इंडियन वेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूट’मध्ये बोलत होते.
धर्मपाल सिंह म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या भूमीवरील अतिक्रमण बुलडोजरद्वारे हटवून ती मुक्त करण्यात येईल आणि तिचा वापर अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी केला जाईल.