पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडनमध्ये आक्रमण

इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात आल्याचा आरोप

नवाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर २ एप्रिल या दिवशी लंडनमध्ये आक्रमण झाले. यामागे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्याचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या आक्रमणात शरीफ यांचा सुरक्षारक्षकही घायाळ झाले आहेत. पाकमध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अविश्‍वासदर्शक ठरावावर मतदान होण्याच्या आदल्या दिवशी ही घटना घडली. पाकमधील विरोधी पक्षांकडून नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या आक्रमणायाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना नवाज शरीफ यांची मुलगी मरियम म्हणाल्या की, हिंसाचाराचा अवलंब करणार्‍या पीटीआयच्या नेत्यांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे, त्यात इम्रान खान यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे.