‘वॉल्ट डिस्नी’कडून मनोरंजन मालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात समलैंगिक पात्रांचा समावेश करण्याचा निर्णय !

  • बालमनावर अयोग्य संस्कार करण्याचा अमेरिकेतील विकृत प्रकार !

  • अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात तिसरीपर्यंतच्या मुलांना लैंगिक शिक्षण देण्यापासून मज्जाव करणार्‍या कायद्याचा आस्थापनाकडून निषेध !

आधीच संस्कारांच्या नावाने बट्ट्याबोळ असलेली आणि समाजमनाला विनाशाकडे घेऊन जाणारी अमेरिका आता तेथील लहान मुलांच्या मनावर समलैंगिकतेच्या विकृतीचा मारा करणार आहे. त्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय यातूनतरी काही बोध घेतील का ?

कॅलिफोर्निया (अमेरिका) – ‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’ यांसारखी अनेक काल्पनिक पात्रे असणार्‍या मनोरंजन मालिका बनवून लहान मुलांना त्यांचे वेड लावणार्‍या ‘वॉल्ट डिस्नी’ या अमेरिकी आस्थापनाने आता एक विकृत निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्याने तिसरीपर्यंतच्या मुलांना लैंगिक शिक्षण देण्यापासून मज्जाव करणार्‍या कायद्याचा आस्थापनाने निषेध केला आहे. या कायद्याला आस्थापनात मोठ्या प्रमाणात असलेल्या समलैंगिक कर्मचार्‍यांनी विरोध दर्शवल्याने आस्थापनाने लहान मुलांसाठी असणार्‍या कार्यक्रमांत समलैंगिक पात्रे घालण्याचा निर्णय घेतला. यासाठी वर्ष २०२२ च्या शेवटापर्यंत आस्थापन त्याच्या एकूण पात्रांपैकी ५० टक्के पात्रे ही समलैंगिक अथवा तृतीयपंथी असल्याचे दाखवणार आहे, अशी घोषणा आस्थापनाच्या मनोरंजन विभागाच्या संचालिका केरे बुर्क यांनी केली.