परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित २ शोधनिबंध मार्च २०२२ या मासामध्ये वैज्ञानिक परिषदांमध्ये सादर !
वरील दोन्ही शोधनिबंधांचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे सहलेखक श्री. शॉन क्लार्क (संपादक, ‘ssrf.org’ आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य) असून त्यांनीच त्यांचे सादरीकरणही केले आहे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत १६ राष्ट्रीय आणि ७४ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.