विविध देशांचे रशियाशी असलेल्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – विविध देशांचे रशियाशी वैयक्तिक संबंध आहेत. हे एक ऐतिहासिक आणि भौगोलिक सत्य आहे. आम्ही या संबंधांमध्ये हस्तक्षेप करण्याचे काम करत नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात आले आहे. भारताच्या दौर्यावर आलेले अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंह यांनी ‘चीनने भारतात घुसखोरी केली, तर रशिया भारताला साहाय्य करणार नाही’, असे विधान केले होते. रशियावर जगभरातून निर्बंध घातले असतांना भारताने रशियाकडून इंधन खरेदी केल्याच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले होते. त्यावर अमेरिकेनेच वरील स्पष्टीकरण दिले आहे.
यात पुढे म्हटले आहे, ‘आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणत्याही गोष्टीत संघटित होऊन आवाज उठवावा, यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. रशियाच्या अयोग्य, अकारण, पूर्वनियोजित आक्रमकतेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. हिंसा समाप्त करण्याचे आवाहन केले पाहिजे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भारतासहित अन्य देशांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.’