शांघाय (चीन) शहरात कोरोनामुळे दळणवळण बंदी

शांघाय (चीन) – चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्रांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी शांघायमध्ये २ टप्प्यांमध्ये दळणवळण बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना चाचणीसाठी तपासणी केंद्रावर जाण्याची सूचना देण्यात आली होती. कुणीही बाहेर पडू नये, यासाठी घराबाहेरील कुंपणाला कुलूप लावण्यात आले आहे. जेवण आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा एका ठिकाणापर्यंत पोचवण्यात येत आहे.