अयोध्येतील मंदिरे, मठ आणि धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा कर रहित !  

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील मंदिरे, मठ आणि अन्य धार्मिक स्थळे यांना भरावा लागणारा व्यावसायिक कर रहित करण्यात करण्याचा आदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील नगरपालिकेला दिला. योगी आदित्यनाथ यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच अयोध्येला भेट दिली. त्या वेळी त्यांनी हा निर्णय घेतला. अयोध्या नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणची मंदिरे, मठ आणि अन्य धार्मिक स्थळे यांना व्यावसायिक कर आकारण्यात येत होता. त्यातून लाखो रुपयांचा महसूल मिळत होता. हा कर रहित करण्याची मागणी मंदिरे आणि मठ यांच्या प्रमुखांनी अनेकदा केली होती. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला.

अयोध्येतील भूमीपूजन, म्हणजे शिलान्यास झाल्यानंतर साजरी होणारी यंदाची रामनवमी ही पहिलीच आहे. त्यामुळे ही रामनवमी धडाक्यात साजरी करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. या रामनवमीचे नियोजन कसे करायचे ? या संदर्भात त्यांनी अधिकारी आणि मंदिरांचे प्रमुख यांची बैठक घेतली.