राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० !
नवी देहली – राज्यसभेत प्रथमच भाजपची सदस्य संख्या १०० झाली आहे. हा विक्रम करणारा भाजप वर्ष १९९० नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ अल्प, म्हणजे केवळ २९ झाले आहे.
From 55 in 2014 to over 100: BJP becomes the first party after Congress in 1988 to cross 100 seats in Rajya Sabhahttps://t.co/cwXCJcjjF8
— OpIndia.com (@OpIndia_com) April 2, 2022
वर्ष २०१४ मध्ये राज्यसभेत भाजपची संख्या ५५ होती आणि तेव्हापासून अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळवल्यामुळे ही संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे १३, द्रविड मुन्नेत्र कळघम्चे (द्रविड प्रगती संघ) १०, बीजू जनता दलाचे ९, आम आदमी पक्षाचे ८, तेलंगाणा राष्ट्र समितीचे ६, वाय.एस्.आर्.सी.पी.चे ६, ए.आय.ए.डी.एम्.के.चे ५, राष्ट्रीय जनता दलाचे ५ आणि समाजवादी पक्षाचे ५ असे सदस्य आहेत.