चैत्र नवरात्रीच्या ९ दिवसांत मांस विक्रीची दुकाने बंद ठेवा !

उत्तरप्रदेश सरकारचा आदेश

जर उत्तरप्रदेश सरकार असा आदेश देऊ शकते, तर अन्य भाजपशासित राज्ये का देऊ शकत नाहीत ?, असा प्रश्‍न हिंदू भाविकांच्या मनात उपस्थित होतो ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – २ एप्रिलपासून प्रारंभ झालेल्या चैत्र नवरात्रीच्या काळात, म्हणजे १० एप्रिलपर्यंत राज्यांतील मांस विक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने दिला. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याने हे निश्‍चितही केले पाहिजे की, त्याच्या सीमेमध्ये या ९ दिवसांत मांस विक्रीचे एकही दुकान उघडले जाऊ नये. ‘जर उघडले गेले, तर त्याचे दायित्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखावर राहील’, असेही आदेशात म्हटले आहे.

 (सौजन्य : Webdunia Hindi)

या आदेशाची कार्यवाही होत आहे कि नाही, हे पहाण्यासाठी विविध पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. जर मांस विक्रीचे दुकान उघडे दिसले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.