#Gudhipadva : ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होणे अन् ते ग्रहण करण्यासाठी गुढी उभी केली जाणे !

कु. मधुरा भोसले

इतर दिवसांच्या तुलनेत गुढीपाडव्याला ब्रह्मदेवाकडून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व यांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणावर प्रक्षेपण होत असते. हे प्रक्षेपण ग्रहण करण्यासाठी गुढीपाडव्याला दारापुढे गुढी उभी केली जाते. गुढी उभारल्याने तिच्या माध्यमातून सत्त्वगुण, चैतन्य, ज्ञानलहरी आणि सगुण-निर्गुण ब्रह्मतत्त्व घरात सहजपणे प्रवेश करू शकतात. ब्रह्मतत्त्वाने गुढीमध्ये प्रवेश केल्यावर गुढीला लावलेल्या फुलांच्या माळा, साखरेची माळ, तांब्याचा कलश आणि आंब्याची पाने यांमध्ये हे तत्त्व आकृष्ट होते आणि त्या वस्तू ब्रह्मतत्त्वाने संपृक्त होतात. यांतील ग्रहण करण्यायोग्य वस्तू ग्रहण केल्यास अथवा वास्तूत ठेवल्यास त्यांचा लाभ जिवाला होतो आणि त्याच्या पेशीपेशीत ब्रह्मतत्त्व जाणे सोपे होते. जिवात जेवढा भाव अधिक, तेवढा त्याला प्रत्येक सणाचा आणि ईश्वराकडून वेळोवेळी प्रक्षेपित होणाऱ्या ज्ञानलहरी, शक्ति, चैतन्यलहरी, सत्त्वलहरी आणि विशिष्ट देवतेच्या तत्त्वलहरी यांचा पुरेपूर लाभ घेता येतो.

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ९.३.२००५)

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष