तिथी लिहितांना ‘पक्षा’चा उल्लेख टाळणे योग्य असणे
‘सध्या तिथी लिहितांना आपण ‘चैत्र शु.प. १ (चैत्र शुक्ल पक्ष १)’ अशी लिहितो. ज्योतिषशास्त्रानुसार तिच्यातील ‘पक्ष’ या अर्थाने लिहिला जाणारा ‘प.’ हा शब्द अनावश्यक आहे. प्रचलित लेखनातही तिथी लिहितांना हा उल्लेख केला जात नाही. दुसरे असे की, ‘चैत्र शु.प. १’ या शब्दप्रयोगात ‘चैत्र’ हा मास (महिना) आहे; परंतु तिथीमध्ये आपण ‘मास’ या अर्थाने ‘मा.’ असे ‘चैत्र’च्या पुढे लिहीत नाही. ज्याप्रमाणे आपण ‘मास (महिना)’ हा कालवाचक शब्द तिथीमध्ये लिहिण्याचे टाळतो, त्याचप्रमाणे ‘पक्ष (पंधरवडा)’ हा कालवाचक शब्दही लिहिण्याचे टाळू शकतो. त्यामुळे येथून पुढे आपण तिथी ‘चैत्र शु. १’ अशी लिहावयाची आहे.’
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०२२)