गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून व्यापक प्रमाणात धर्मप्रसार !
धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग !
कोल्हापूर, १ एप्रिल (वार्ता.) – हिंदूंचे नववर्ष गुढीपाडव्याचे शास्त्र अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोचवण्यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रवचन, फलकप्रसिद्धी, सामूहिक गुढी, सामाजिक माध्यम यांद्वारे व्यापक प्रमाणात धर्मप्रसार करण्यात येत आहे. या कार्यात धर्मप्रेमींचा कृतीशील सहभाग आहे.
१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उंचगाव येथील रिक्शांवर, तसेच रुईकर कॉलनी येथील हनुमान मंदिर येथे भीत्तीपत्रके लावण्यात आली.
२. जत्राट (कर्नाटक) येथे धर्मप्रेमींनी पुढाकार घेऊन गुढीपाडव्याचे प्रबोधन करणारी भीत्तीपत्रके लावली.
३. यळगुड (जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले) येथे विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमी सौ. वैशाली माने आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांनी गुढीपाडवा कसा साजरा करावा ?, तसेच साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन केले.
४. कोल्हापूर येथील त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी त्यांच्या रुग्णालयात गुढीपाडव्याच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेला सत्संग दूरचित्रवाहिनीवर लावला होता. त्यामुळे अनेक रुग्णांपर्यंत हा विषय पोचण्यास साहाय्य झाले.
५. सांगली येथील स्थानिक ‘सी’ केबलच्या ‘भक्ती’ वाहिनीवर आणि कोल्हापूर येथील ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवर सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या विशेष धर्मसत्संगाचे प्रक्षेपण करण्यात आले. यामुळ लाखो लोकांपर्यंत विषय पोचवणे शक्य झाले.
६. सांगली-कोल्हापूर येथील अनेक फलकांवर गुढीपाडव्याचे शास्त्र सांगणारा मजकूर लिहिण्यात आला होता.
७. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारण्यात येणार आहे.