श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन
४५ जणांना अटक
कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली. आंदोलन करणार्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केल्यावर हिंसा चालू झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. पोलिसांनी आश्रूधुरासमवेतच पाण्याचा मारा करून आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनी एका बसलाही आग लावली. राष्ट्रपतींच्या घरासमोर हा सर्व गोंधळ चालू असतांना ते स्वत: मात्र घरी नव्हते. या वेळी आंदोलनकांना रोखण्यासाठी विशेष कृती दल आणि अर्धसैनिक दल यांचा वापर करण्यात आला. या ठिकाणी सध्या संचारबंदी लागू करण्यात आली असून ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये अनेक आठवड्यांपासून खाद्यपदार्थांसमवेतच जीवनावश्यक वस्तूंचे दर, इंधन, गॅसचा तुटवडा आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
डिझेल नसल्याने १३ घंट्यांहून अधिक काळ श्रीलंकेत संपूर्ण वीजपुरवठा खंडित होता. वीज वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवेही बंद करण्यात आले होते. खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम सरकारी रुग्णालयांवरही झाला.
Sri Lanka imposes curfew in capital after protests over economic crisishttps://t.co/OgdGdENvXW pic.twitter.com/VH7h8yOCeK
— The_Nation (@The_Nation) April 1, 2022