#Gudhipadva : १ जानेवारीला नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा !
सध्या नववर्षारंभ सर्वत्रच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला साजरा केला जातो. नववर्षारंभ साजरा करण्याच्या या पद्धतीस विकृत स्वरूपही प्राप्त झाले आहे. ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत खार्या, गोड्या जेवणावळी, मद्यपान करून ध्वनीवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मारामार्या करणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, अश्लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, महिलांची छेड काढणे, यांसारखे अनेक गैरप्रकारही होतात. यांमुळे नव्या वर्षाचा प्रारंभ शुभ होण्याऐवजी अशुभ पद्धतीने होते. नव्या वर्षाचा प्रारंभ मंगलदायी व्हावा, यासाठी शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर आणि फायदेशीर आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजेच सत्ययुगाला आरंभ झाला, तो गुढीपाडवा हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने भारतीय संस्कृतीचे होणारे अध:पतन आपणच रोखणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे.
भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा
‘भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्या व्हायच्या. सध्या मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘सारी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होतात. महाविद्यालयांच्या उपहारगृहांतील उसळ-मिसळची जागा आता महागड्या ‘पिझ्झा-बर्गर’ने घेतली आहे. ८० टक्क्यांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ यांसारख्या पुरुषी वेशांत महाविद्यालयांत विद्येचे धडे घेतांना दिसतात. पूर्वी चित्रपटांतही क्वचितच दिसणार्या ‘मिडी-मिनी’वेषातील मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात वावरतांना दिसतात. मुंबईतील एका संस्थेने केलेल्या चाचणीनुसार सध्याच्या बहुसंख्य मुलींचे कौमार्य वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षीच भंग होते. पुरोगामित्त्वाच्या नावावर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने युवापिढीचा असा र्हास होत चालला आहे. आजची युवापिढी केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून त्यांचे लांगूलचालन करण्यातच आपली धन्यता मानू लागल्याने आपली मूळ हिंदु संस्कृती हरवत चालली आहे. परिणामी आजची युवापिढी दिशाहीन आणि ध्येयहीन झाली आहे. संस्कृतीला अनुरूप कृती करणे, हे आजच्या पिढीला लज्जास्पद वाटते. पाश्चात्त्यांच्या पावलांवर पावले टाकून आज आपणसुद्धा (हिंदू) १ जानेवारी हा आपला वर्षारंभ मानून आदल्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.
भारतीय संस्कृतीचे महत्त्व
भारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. आपला तरुणवर्ग मात्र पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.
१ जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ
१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘१ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष १ जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृतीतर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. आपल्याला आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. पाश्चात्त्य प्रथा मानवाला नीतीहीन बनवतात, तर हिंदु संस्कृती संयमी आणि सदाचारी बनवते !
१. ३१ डिसेंबराला रात्री नववर्षारंभ साजरा करणे, ‘पार्ट्या’ करणे इ. पाश्चात्त्य प्रथा टाळा; कारण ते वैचारिक धर्मांतरच आहे !
२. ‘१ जानेवारी’ ला नववर्षाच्या शुभेच्छा देऊ नका वा स्वीकारू नका !
३. गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा आणि हिंदु संस्कृती जोपासा !
४. नववर्ष पाश्चात्त्यांप्रमाणे ३१ डिसेंबरच्या रात्री नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करा !
५. हिंदूंनो, १ जानेवारीला नववर्ष साजरे करून किती काळ इंग्रजांच्या दास्यत्वात रहाणार ?
६. गुढीपाडव्याला वर्षारंभ करणे म्हणजे स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे !
निधर्मी शासनाने येथील मातीशी मुळीच संबंध नसलेले हिंदूंवर लादलेले दिवस पालटले पाहिजेत !
हिंदु धर्म अनादी असल्यामुळे त्याचा प्रत्येक गोष्टीत अनादी ईश्वराच्या विविध रूपांशी संबंध असतो, उदा. विश्वात श्री गणेशतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा ज्ञानदायी आणि विघ्नहर्ता श्री गणेशचतुर्थी; शक्तीतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा नवरात्र; ज्ञान, भक्ती आणि वैराग्यदायी शिवतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा शिवरात्र असते. याउलट इतर पंथियांतील महत्त्वाचे दिवस पृथ्वीवर होऊन गेलेल्या घटनांशी संबंधित आहेत. पुढील काही उदाहरणांवरून हिंदु धर्माची महानता आणि भारतियांची ‘इंग्रजांची मानसिक गुलामगिरी’ अन् विचारांचा क्षुद्रपणा लक्षात येईल.
अ. भारतीय संस्कृतीवर आधारित ‘शालिवाहन शक’ इत्यादी शक वर्षगणनेसाठी न मानता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून काळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेले ‘इ.स.’ ही पद्धत वर्षगणनेसाठी पाळायला आरंभ केला.
आ. पाडव्याला निर्मितीशी संबंधित प्रजापतिलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो वर्षारंभाचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून १ जानेवारी हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस वर्षारंभाचा दिवस म्हणून पाळायला आरंभ केला.
इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो ‘शिक्षक दिन’ म्हणून न पाळता भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळायला आरंभ केला.
ई. लष्करातील जवानांचा दिवस विजयादशमीला साजरा केला असता, तर ते योग्य झाले असते.
उ. धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याची देवता ‘धन्वंतरी’ हिचा दिवस म्हणून पाळण्याऐवजी पाश्चात्त्यांचा ‘जागतिक आरोग्यदिन’ मानसिक गुलामगिरीतून स्वीकारला.
ऊ. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून १ एप्रिल हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून पाळायला आरंभ केला.
ए. आठवड्याचा सुटीचा दिवस म्हणून भारतीय संस्कृतीतील सर्वांत महत्त्वाचे तत्त्व म्हणजे गुरुतत्त्व त्याची उपासना करण्यासाठी ‘गुरुवार’ हा दिवस न ठेवता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून ‘रविवार’ हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस निवडला.
ऐ. बालकांशी काहीएक संबंध नसलेल्या नेहरूंचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा करणे चालू झाले. त्याऐवजी तो बालकांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदातील ग्रंथ लिहिणारे महर्षी कश्यप यांच्या नावे साजरा करणे योग्य झाले असते. याउलट पाकिस्तानने इस्लामवर आधारित कालगणना आणि इतर गोष्टी स्वीकारल्या, उदा. हिजरी शक चालू करून रविवारऐवजी शुक्रवार हा दिवस साधना करता यावी, यासाठी सुटीचा दिवस ठरवला. इस्लामवर आधारित राज्यकारभारामुळे छोटासा पाकिस्तान ‘महान’ भारताला क्रिकेटपासून राजकारणापर्यंत प्रत्येक गोष्टीत जगात हरायला लावतो.
– प.पू. डॉ. जयंत आठवले, सनातन संस्थेचे प्रेरणास्थान
३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच !
हिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा !
खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. या दिवशी काय काय करायचे, नवीन काय खरेदी करायचे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, सुटीसाठी कोणत्या ठिकाणी जायचे, याची सिद्धता ते जोमाने करतात. आजही मुख्य शहरांपासून ते ज्या ठिकाणी वीज आणि पाणीसुद्धा नियमित येत नाही, अशा गावागावांमध्येही हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो. पाश्चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून त्यांना भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान हिंदूंना राहिले नाही. याच गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेखप्रपंच.
धर्माभिमान नसलेले हिंदू !
एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्ती त्या धर्मातील प्रथा व उत्सव साजरा करून त्या धर्माचे आचरण करते. याचप्रमाणे आपणही जर आपल्या धर्माप्रमाणे आचरण न करता, इतर धर्मांप्रमाणे म्हणजेच ३१ डिसेंबर वा ख्रिसमस यांसारखे दिवस साजरे करायला लागलो, तर इतर धर्माप्रमाणे आचरण केल्याने एका दिवसापुरते का होईना, आपण धर्मांतरण केल्यासारखेच होईल. मात्र हिंदूंना आपला धर्म विसरून भोगवादी पाश्चात्त्यांचे दिवस साजरे करतांना धर्मद्रोहाचे पाप आपल्याच माथी लागत आहे, याची जाणीव नाही. आज हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.
गुढीपाडवा सणापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीला अधिक महत्त्व देणारे जन्महिंदू !
हल्ली ३१ डिसेबरच्या रात्री लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण एकमेकांना भेट कार्डाद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून हॅपी न्यू इयर म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देत असतात. मुळात भारतीय संस्कृतीप्रमाणे गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षदिन असतांना हिंदू मात्र नववर्षदिन म्हणून ३१ डिसेबरची रात्र साजरा करण्यात धन्यता मानतात. अलीकडच्या काळात गुढीपाडवा या भारतीय वर्षारंभी एकमेकांना शुभेच्छा देणारे हिंदू बघायला मिळणे दुर्मिळ झाले आहे.
भोगवादी युवापिढीचे निद्रिस्त पालक !
हिंदु धमार्र्त सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ब्राह्ममुहुर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्रे व अलंकार परिधान करून, धार्मिक विधीने करतात. त्यामुळे व्यक्तीवरही त्या वातावरणातील सात्त्विकतेमुळे चांगले संस्कार होत असतात.
३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून, धांगडधिंगा करत भोगवादी वृत्तीने रात्र घालवल्याने आपल्या चित्तावर होणारे संस्कारही तसेच भोगवादाचेच होणार, तसेच रात्रीच्या वेळी वातावरणही तामसिक असल्याने आपल्यातील तमोगुण वाढणार. या गोष्टींचे ज्ञान नसल्याने म्हणजेच धर्मशिक्षणाच्या अभावामुळे या प्रकारांना बळी पडून आजची तरूण पिढी भोगवादी व चंगळवादी बनत चालली आहे आणि याबाबत कोणत्याही प्रकारची जाणीव त्यांच्या पालकांमध्येही दिसून येत नाही.
पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारूया !
आज हिंदु धर्मावर विविध मार्गाने आक्रमणे होत असून पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण सर्वांत मोठे आहे, हे आक्रमण मोडून काढण प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ज्या प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला आले आणि तेथे गुढी उभारून विजयदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदूंनो, या रावणरूपी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारून आपले धर्मकर्तव्य बजावा !
– सौजन्य सनातन प्रभात
भारतियांनो, राष्ट्रीय वर्षही गुढीपाडव्यालाच प्रारंभ होते, हे लक्षात घ्या !
१. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी सौर कालगणना सिद्ध करून घेणे
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकाराने मान्यवर शास्त्रज्ञ डॉ. मेघनाद सहा यांच्या अध्यक्षतेखाली कालगणना पुनर्रचना समितीने १९५६ पासून सौर कालगणना सिद्ध केली. २२ मार्च १९५७ पासून ही कालगणना आपल्या देशाची राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणून अस्तित्वात आली; पण शासकीय उदासीनतेमुळे ही दिनदर्शिका कुठेही वापरली जात नाही. ग्रेगेरियन दिनदर्शिकेचा प्रसार आक्रमकरित्या होत असल्याने ती सर्वत्र वापरली जाते.
२. चैत्र प्रतिपदेचे वैज्ञानिक महत्त्व जाणा !
ग्रेगेरियन दिनदर्शिकेप्रमाणे १ जानेवारीला वर्षाचा आरंभ होतो. वास्तविक त्या दिवशी अवकाशात कोणतीही विशेष घटना होत नसते. त्याउलट सौर वर्षाप्रमाणे नववर्ष दिन १ सौर चैत्र असतो. त्या दिवशी सूर्य विषुववृत्तावर येत असल्याने दिवस आणि रात्र दोन्ही समसमान असते. म्हणूनच या दिवसाला, म्हणजेच विषुवदिनाला वैज्ञानिक महत्त्व आहे.
३. सौर कालगणनेसाठी झटणारी मराठी विज्ञान परिषद
शास्त्रीय घटनेवर आधारित असल्याने जागतिक स्तरावर सौर दिनदर्शिकेचा वापर होण्याची तिची पात्रता आहे, असा मराठी विज्ञान परिषदेचा दावा आहे. तिच्या प्रसारासाठी प्रयत्नदेखील होत आहेत; परंतु त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही दिनदर्शिका काळाच्या ओघात विस्मरणात जाऊ लागली आहे. सौर कालगणनेच्या वापराच्या आग्रहामुळे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यांना अनेकदा न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पण त्यानंतरही त्यांनी या कालगणनेचाच वापर व्हावा हा आग्रह सोडलेला नाही, हे कौतुकास्पद !
(दैनिक महाराष्ट्र टाइम्स, २१.१२.२०१५)
नववर्षारंभ ३१ डिसेंबरला साजरे करून महान भारतीय संस्कृतीचे हनन करण्याचे पातक आेढवून घेऊ नका !
१. रामनवमी, हनुमान जयंती इत्यादी हिंदु सण साजरे करण्यामागे धर्मशास्त्रात आधार; मात्र ३१ डिसेंबर साजरा करण्यामागे धर्मशास्त्रात कुठे आहे आधार ?
खरंच ३१ डिसेंबर साजरा करून आपल्या मुलांचे हित होणार की आपल्या देशाचे हित होणार ? हे सर्व करून पर्यायाने आपला वेळ, पैसा, श्रम, तसेच आजची पिढी यांचाच नाश होणार नाही का ?
३१ डिसेंबर साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करणे, हा आपला उद्देश असेल, तर मला सांगा, ३१ डिसेंबरला धर्मशास्त्रात कुठे आधार आहे का ? जसे रामनवमी, हनुमान जयंती, दिवाळी, दसरा इत्यादी हिंदूंचे सर्व सण साजरे करण्यामागे काहीतरी ऐतिहासिक, पौराणिक किंवा धार्मिक (आध्यात्मिक) कारणे आहेत. हे सण साजरे केल्याने आपली संस्कृती जोपासली जाईल, सर्व लहान-थोरांवर सुसंंस्कार होतील. सदगुणांची जोपासना होऊन आपल्या मरगळलेल्या मनाला तजेला आणि त्यातून वैयक्तिक आनंद, राष्ट्रीय उन्नती, संघभावना वृद्धींगत होईल.
३१ डिसेंबर आणि १ जानेवारी साजरे करण्यामागे असे काहीतरी कारण असेेल, असे वाटत नाही. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजाळलेल्या लोकांनी १ जानेेवारीला नववर्षारंभ करून आपल्या संंस्कृतीचे हनन केलेलेे जिकडे तिकडे दिसते.
२. पालकांनो, मुलांना अवास्तव मोकळीक देणे, हे मुलांचे जीवन अंती उद्धवस्त करणार आहे, हे लक्षात घ्या !
एक सुजाण नागरिक म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारू इच्छितेे, आपणच आपल्या पाल्यांना असे वागण्याची अनुमती देऊन त्यांचा सर्वनाश करायला कारणीभूत आहोत, असे आपल्याला वाटत नाही का ? आपण संस्कृतीचे रक्षण करण्याऐवजी संस्कृतीचे हनन करून आपल्या मुलांचे जीवन उद्धवस्त करत आहोत आणि याच त्यांच्या अवगुणांनी पुढे ते आपल्यालाही उद्धवस्त करणार आहेत. आपण जसे पेरलेे, तसेच उगवणार ना ? आपले कुटुंब वाचायला हवे, तर योग्य वेळीच डोळ्यांवरचे झापड काढून शहाणपणाने आपल्या संस्कृतीनुसार वागायला हवे. त्यामुळे आपल्या मुलांवर सुसंस्कार होतील आणि ती आपल्या कुटुंबाचे, पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करतील.
वाचकहो, अजूनही वेळ गेलेली नाही. या सगळ्याचा गांभीर्याने विचार करा, अशी कळकळीची विनंती ! आपण चैत्र शुक्ल प्रतिपदेला धर्मशास्त्रानुसार नववर्षारंभ साजरे करणार, असा सर्वांनी आजच निश्चय करा !
– सौ. स्मिता गंगाधर तांडेल, अंधेरी, मुंबई. (२८.१२.२०१३)
(केवळ मद्यप्राशन आणि धांगडधिंगा एवढ्यांवरच आजची पिढी थांबलेली नाही. त्याच्याही पुढे जाऊन आजची तरुण मुले मादक पदार्थांच्या एवढी अधीन झाली आहेत की, त्यांनी स्वतःला पूर्णपणे बरबाद करून घेतले आहे. या नशेपायी या मुलांनी कोट्यवधी रुपयांचा चुराडा आणि ईश्वराने दिलेला दुर्मिळ असा मनुष्यदेहही उद्ध्वस्त करून टाकला आहे. पूर्वी केवळ महानगरातील गर्भश्रीमंत मुले याला बळी पडत होती. आता मात्र छोट्या-मोठ्या शहरांतीलही अनेक मुले-मुली याच्या विळख्यात सापडली आहेत. कित्येक जण ३१ डिसेंबरच्या रात्री या नशापाण्याला आरंभ करतात आणि त्यांचे तथाकथित नववर्ष व्यसनारंभानेच चालू करून अधोगतीच्या मार्गावर पाऊल ठेवतात. यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेतली जाईल आणि त्यांच्यात छत्रपती शिवरायांसारखा पराक्रम करण्याची स्फूर्ती निर्माण होईल, असे राष्ट्र, म्हणजेच हिंदू राष्ट्र निर्माण करणे अपरिहार्य आहे ! – संकलक)
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणातून साजरा केला जाणारा आणि नियमांचे वाढते उल्लंघन होत असलेला ख्रिस्त्यांचा नववर्ष उत्सव !
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ३१ डिसेंबरच्या निमित्ताने ख्रिस्ती नववर्ष साजरे करतांना सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याचे लक्षात आले आहे. ३१.१२.२०१४ च्या रात्री पोलिसांनी ३ सहस्र ३८ जणांवर कारवाई केली. (३.१.२०१५)
#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष