राज्यात ‘मास्क’चा वापर ऐच्छिक ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढता येतील !
मुंबई – कोरोनानिमित्त राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. ‘मास्क’चा वापर ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे आता गुढीपाडवा साजरा करता येईल, तसेच शोभायात्रा उत्साहात काढता येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना टोपे यांनी वरील माहिती दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘नागरिकांना यापुढे सर्व सण आणि उत्सव उत्साहात साजरा करता येतील. बस, रेल्वे यांमधील प्रवाशांची मर्यादा, हॉटेल-चित्रपटगृह यांची मर्यादा, दुहेरी मास्क आदी सर्व निर्बंध रहित करण्यात आले आहेत. मास्क घालणे ऐच्छिक असले, तरी नागरिकांनी स्वत:ची आणि अन्यांच्या आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने ‘मास्क’चा उपयोग करावा.’’