चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग : ५ शहरांत दळणवळण बंदी
२ वर्षांनंतर प्रथम ओढवली भयावह स्थिती !
बीजिंग – चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने कार्यान्वित केलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ही कुचकामी ठरतांना दिसत आहे. कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ विषाणूंमुळे बाधित झालेल्यांचा आकडा ६२ सहस्त्रांच्या पुढे पोचला आहे. अशा परिस्थितीत चीनची आर्थिक राजधानी शांघाईसह ५ मोठ्या शहरांत दळणवळण बंदी घोषित करण्यात आले आहे.
चीनमधील सुमारे १२ सहस्र सरकारी रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरली आहेत. नवीन रुग्णांना भरती करून घेण्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही. चीनचे सर्वांत मोठे व्यावसायिक केंद्र असलेल्या शांघाईमध्ये पुढच्या शुक्रवारपर्यंत दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. चीन जगातील सर्वाधिक लसीकरण झालेला देश आहे. चीनमध्ये ८८ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला कोरोनाच्या लसीच्या दोन मात्रा दिल्या गेल्या आहेत.