रशियाकडून विषप्रयोग झाल्याच्या संशयामुळे युक्रेनकडून चर्चेत सहभागी झालेल्यांसाठी नियमावली !
कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्याविषयी चर्चा चालू आहे. आता या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या युक्रेनच्या प्रतिनिधींना नियमावली ठरवून देण्यात आली आहे. यानुसार चर्चेच्या वेळी काहीही खाण्यापिण्याला मनाई करण्यात आली आहे. त्याचसमवेत कोणत्याही वस्तूला स्पर्श करतांनाही सावध रहाण्याची सूचना करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीचे कारण म्हणजे याआधीच्या चर्चेनंतर युक्रेनच्या प्रतिनिधी मंडळातल्या काही लोकांची प्रकृती बिघडली होती. यात रशियाचे उद्योगपती रोमन अब्रमोविच यांचाही समावेश होता. त्यांच्या शरिरात विषाचा अंश आढळून आल्याचा दावा युक्रेनने केला होता. रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला असला, तरी युक्रेनला कोणताही धोका पत्करायचा नाही.