हिंदु युवकांना मटणाचे दुकान थाटण्यास मी आर्थिक साहाय्य करीन ! – रेणुकाचार्य, सचिव, मुख्यमंत्री, कर्नाटक
बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु युवकांना मटणाचे दुकान थाटण्यास मी निश्चितच प्रोत्साहन देईन. स्वतःचे दुकान घालण्यासाठी मी स्वतः त्यांना आर्थिक साहाय्य देखील करीन. व्यापारासाठी त्यांना जितके आर्थिक साहाय्य हवे, तितके देईन, असे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांनी म्हटले आहे. ‘पैशांसाठी थुंकी लावून पदार्थ विक्री केल्याचे आपण पाहिले आहे. ‘हलाल’चा मी विरोध करतो. ‘कुराण’मध्ये ‘थुंकी लावा’, असे सांगितले आहे का ? सर्व हिंदूंनी ‘हलाल’चा विरोध केला पाहिजे’, असेही ते म्हणाले.