राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
मुंबई – कोरोना काळात राज्यातील सहस्रो विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. हे गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना पारपत्र आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत असल्यामुळे गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या कालावधीत जे विद्यार्थी आणि नागरिक यांच्यावर गुन्हे नोंद आहेत, त्यांना परदेशात जाण्यासाठी पारपत्र काढतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत लवकरच हा विषय मांडण्यात येणार आहे. तसेच ‘बैलगाडा शर्यती चालकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला आहे’, असे गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितले.