इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात २५ मार्चला विरोधी पक्षांनी अविश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर ३१ मार्च या दिवशी संसदेत चर्चा होणार आहे. पाकच्या संसदेत ३४२ सदस्य असून खान यांच्या पक्षाचे १५५ सदस्य आहेत. पंतप्रधान खान यांना सत्तेत रहाण्यासाठी किमान १७२ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे सुमारे २४ खासदार बंडखोर झाले आहेत, तसेच सरकारमधील मित्रपक्ष, एम्.क्यू.एम्.पी., पी.एम्.एल्.क्यू. आणि जमहूरी वतन या पक्षांनी पाठिंबा काढला आहे. त्यामुळे पंतप्रधान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे.