कीव येथील सैनिकी कारवाई न्यून करण्याच्या रशियाच्या आश्वासनावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून संशय व्यक्त !

कीव (युक्रेन) – युक्रेनियन लोक भोळे लोक नाहीत. युक्रेनियन लोकांनी गेल्या ३४ दिवसांच्या आक्रमणाच्या आणि गेल्या ८ वर्षांच्या डोनबासमधील युद्धात आधीच शिकले आहे की, केवळ ठोस निकालावर विश्वास ठेवता येईल, अशा शब्दांत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी रशियाने कीव येथे सैन्य कारवाई न्यून करण्याच्या दिलेल्या आश्वावनावर संशय व्यक्त केला आहे. त्या वेळी झेलेंस्की यांनी वाटाघाटीतून सकारात्मक संकेत मिळाल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेनेही या संदर्भात ‘धोका अद्याप संपलेला नाही’, असे सांगत युक्रेनला सावध केले आहे.

झेलेंस्की म्हणाले, ‘‘आम्हाला चर्चेतून जे संकेत मिळाले ते सकारात्मक आहेत; पण आम्ही सर्व धोके तपासून पहात आहोत. आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही.’’