संभाजीनगर येथे युवा सेनेच्या मेळाव्यातच १५ मिनिटे हाणामारी !
कार्यकर्त्यांनी हाणामारी करू नये, यासाठी नेत्यांनी कार्यकर्त्यांना नैतिकमूल्ये शिकवणे आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! – संपादक
संभाजीनगर – शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी प्रचंड वाढली आहे. २ मासांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी संभाजीनगर दौऱ्यात त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. २५ मार्च या दिवशी शिवसंपर्क अभियानाचा मेळावा संपल्यावर खासदार विनायक राऊत यांच्यासमोर शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी गटबाजीची तक्रार केली. २९ मार्च या दिवशी संत एकनाथ रंगमंदिराच्या परिसरात युवा सैनिकांमध्ये नियुक्तीवरून १५ मिनिटे हाणामारी झाली.