सोपोर (काश्मीर) येथे बुरखाधारी महिलेने ‘सी.आर्.पी.एफ.’च्या बंकरवर फेकला पेट्रोल बाँब !
आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !
(बंकर म्हणजे तळघर)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – बुरखा परिधान केलेल्या एका महिलेने सोपोर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (‘सी.आर्.पी.एफ’.च्या) बंकरवर पेट्रोल बाँब फेकल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. याविषयी काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, या महिलेची ओळख पटली आहे. तिला लवकरच अटक करण्यात येईल.