पाकमध्ये स्वप्नात ईशनिंदा केल्यामुळे ३ शिक्षिकांकडून सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या !
कुठे पाकमध्ये स्वप्नातही श्रद्धास्थानांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हातात घेणाऱ्या मुसलमान महिला, तर कुठे स्वतःच स्वतःच्या देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू !
(ईशनिंदा म्हणजे श्रद्धास्थानांचा अवमान करणे)
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या डेरा इस्माईल खान येथे ३ महिला शिक्षिकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपावरून त्यांच्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. विशेष म्हणजे स्वप्नामध्ये या मृत शिक्षिकेने ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिसांनी तिन्ही शिक्षिकांना अटक केली आहे.
Pakistan: Madrassa Teachers Slit Colleague’s Throat, Say Victim Committed ‘Blasphemy’ In Their Dreamhttps://t.co/vu0Tfg8g1A
— Swarajya (@SwarajyaMag) March 30, 2022
१. ‘एका १३ वर्षांच्या मुलीला रात्री एक स्वप्न पडले, ज्यामध्ये तिला मृत शिक्षिकेने केलेल्या ईशनिंदेविषयी कळले. स्वप्नात तिला त्या महिलेला मारण्याचा आदेश देण्यात आला’, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे स्वप्न तिने नातेवाईक असलेल्या शिक्षिकेला सांगितल्यावर तिने इतर शिक्षिकांसह या सहकारी शिक्षिकेची हत्या केली.
Welcome to the Islamic Republic of Pakistan! #DIKhan 3 women slaughtered a woman named Safoora, 21 outside the maderrsa. Murderers friend age 13 dreamed that Safoora did blasphemy..GOD oh GOD, we are living in which era?? Make sure your child is away from extremists! #blasphemy pic.twitter.com/rC4HMgGR8J
— Kazim Hussain Channa🇵🇰 (@kazimhc19) March 29, 2022
२. पोलिसांचे म्हणणे आहे की, मृत महिला धार्मिक नेता मौलाना तारिक जमील यांची अनुयायी होती, जे आरोपींना पसंत नव्हते. आरोपी महिला दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात रहाणाऱ्या मेहसूद जमातीच्या होती.