एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद !
एकूण १० दिवस बँकांना सुट्टी
मुंबई – एप्रिल २०२२ पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होणार आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग ३ दिवस बँका बंद रहातील. १ एप्रिल या दिवशी बँक खात्यांचे वार्षिक बंद (क्लोजिंग), २ एप्रिल या दिवशी गुढीपाडवा आणि ३ एप्रिल या दिवशी असलेली रविवारची सुट्टी यांमुळे बँका बंद असतील. त्यामुळे ज्यांना बँकांच्या संदर्भात काही कामे करायची असल्यास ती ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल २०२२ च्या बँकेच्या सुट्ट्यांची सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीनुसार देशभरात विविध ठिकाणी एप्रिलमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद रहाणार आहेत, तर महाराष्ट्र्रात १० दिवस बँका बंद रहातील. यामध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.