काश्मीरचा फुटीरतावादी धर्मांध नेता बिट्टा कराटे याने २० काश्मिरी हिंदूंची हत्या केल्याची दिली होती स्वीकृती !
|
नवी देहली – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला ‘काश्मीर लिबरेशन फ्रंट’च्या फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटे याची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत बिट्टा कराटेने २० काश्मिरी हिंदूंची हत्या केल्याची स्वीकृती दिली होती. बिट्टा कराटेने या मुलाखतीच्या वेळी संवाद साधतांना काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांच्या पाकिस्तान संबंधावरही वक्तव्य केले होते. बिट्टा हा मार्शल आर्ट्सचा ‘ट्रेंड’ होता, म्हणून लोक त्याच्या नावाच्या शेवटी ‘कराटे’ हा शब्द लावू लागले.
Bitta Karate faces trial for murder | It should not become tokenism and one stray trial: @neelakantha
Ashutosh Taploo, who lost his father Tikalal Taploo, also joins us on the broadcast. #BittaKarate | @RichaSharmaB pic.twitter.com/xwNeq5Afe1
— TIMES NOW (@TimesNow) March 30, 2022
१. वर्ष १९९१ मध्ये दिलेल्या मुलाखतीत बिट्टा कराटे याने काश्मिरी हिंदू सतीश कुमार टिक्कू (वय २२ वर्षे) यांच्या हत्येनंतर खोऱ्यात हत्याकांडांची मालिका कशी चालू केली, याचे वर्णन केले आहे. बिट्टाने वर्ष १९९१ मध्ये नजरकैदेत असतांना ही मुलाखत दिली होती. काश्मिरी हिंदूंच्या डोक्यात किंवा हृदयात गोळ्या झाडल्याचा दावा बिट्टाने केला आहे.
२. बिट्टाने मुलाखतीत स्वीकृती दिली होती की, तो पाकिस्तानकडून प्रशिक्षण घेऊन काश्मीरमध्ये परतला आणि आतंकवादी बनला. त्याने असेही सांगितले की, सामान्य लोकांना मारण्यासाठी त्याने पिस्तूल वापरले आणि सुरक्षादलांवर आक्रमण करण्यासाठी एके-४७ चा वापर केला.
(सौजन्य : IndiaToday)
३. बिट्टा याच्या विरोधात आतंकवादाशी संबंधित १९ हून अधिक प्रकरणे नोंद होती. या प्रकरणी त्याला अटक झाली होती. बिट्टा कराटे याने १६ वर्षे कारागृहात घालवली. २३ ऑक्टोबर २००६ या दिवशी ‘टाडा’ (आतंकवादविरोधी कायदा) न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. वर्ष २००८ मध्ये अमरनाथ यात्रेवरील आक्रमणाच्या एका प्रकरणी त्याला अटक झाली होती.
४. वर्ष २०१७ मध्ये या काश्मिरी फुटीरतावादी नेत्याच्या कारनाम्यांचा ‘इंडिया टुडे’च्या ‘ऑपरेशन व्हिलन ऑफ द व्हॅली’ या विशेष अन्वेषणासंबंधीच्या अहवालात पर्दाफाश झाला होता. बिट्टा कराटे आणि त्याची माणसे पाकिस्तानकडून पैसे घेत असल्याची स्वीकृती दर्शवतांना कॅमेऱ्यात पकडले गेले. ‘इंडिया टुडे’च्या खुलाशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) काश्मीरमधील काही फुटीरतावादी नेत्यांवर कडक कारवाई केली होती.