अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना मुंबईत अटक !
|
मुंबई – रिक्शातून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ५ धर्मांधांना २८ मार्च या दिवशी दिंडोशी पोलिसांनी घाटकोपर येथे अटक केली. हुसैन कुरैशी, अब्दुल रज्जाक, रफीक शेख, सलीम आजम शेख आणि अली निजामुद्दीन खान अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण घाटकोपर परिसरात रहाणारे असून गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये ते अमली पदार्थांचा पुरवठा करत होते. मालाड (पूर्व) येथील निर्जन ठिकाणी या युवकांचा संशयास्पद वावर दिसला. पोलीस आल्यावर या युवकांनी रिक्शातून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. रिक्शा आणि त्यांतील अमली पदार्थ पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.