हिंगोली येथे शेतातून जिलेटिनच्या ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर जप्त !
हिंगोली – जिल्ह्यात जिलेटिनच्या ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर सापडले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात हट्टा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सायंकाळी हे जिलेटिन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. तेथील एका शेतात स्फोटक पदार्थ असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तेथे धाड टाकली. पोलिसांनी एकनाथ राठोड याच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.