साधकाला स्वप्नात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा लाभलेला सत्संग आणि सत्संगामुळे आध्यात्मिक लाभ होऊन थकवा न्यून होणे
१. पुष्कळ थकवा आणि अंगदुखी यांमुळे झोपून असतांना स्वप्नात ‘सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी प्रसाद अन् आध्यात्मिक लाभासाठी कागद दिला’, असे दिसणे : आज मला पुष्कळ थकवा आणि अंगदुखी असल्याने मी सकाळपासून झोपून होतो. मागील २ दिवसांपासून मला हे त्रास होत होते. आज सकाळी १० वाजता झोपेत असतांना मला स्वप्नात दिसले, ‘मी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना माझ्या त्रासांविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला प्रसाद दिला. त्यांनी स्वतःच्या वहीतील पानाचा तुकडा फाडून आध्यात्मिक लाभासाठी मला दिला. तो कागद मी माझ्या खिशात ठेवला.’ नंतर मला जाग आली.
२. जाग आल्यानंतर ‘थकवा मोठ्या प्रमाणात न्यून झाला आहे’, असे जाणवणे आणि मनाचा उत्साहही वाढणे : जाग आल्यानंतर ‘माझा थकवा मोठ्या प्रमाणात (६० टक्के इतक्या प्रमाणात) न्यून झाला आहे’, असे मला जाणवले. यापूर्वी असा त्रास झाल्यावर मला १५ ते २० दिवस झोपून रहावे लागायचे आणि त्यानंतर माझा थकवा न्यून व्हायचा; मात्र स्वप्नात सद्गुरु अनुताईंकडून ‘प्रसाद आणि आध्यात्मिक लाभासाठी कागद’ मिळाल्यानंतर मी त्या क्षणी उठून उभा राहिलो. मी आजारपणामुळे निरुत्साही झालो होतो; परंतु स्वप्नात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा सत्संग लाभून मला आध्यात्मिक लाभ झाल्यामुळे मनाचा उत्साहही वाढला.
सद्गुरु अनुताईंच्या कृपेमुळे मला होत असलेला आध्यात्मिक त्रास लवकर दूर झाला अन् मला चैतन्यदायी अनुभूती आली. त्याबद्दल मी परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु अनुताई यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– श्री. बळवंत पाठक, वडाळा, मुंबई. (८.११.२०२१)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |