आमदारांसाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – आमदारांना घरे द्यायला नको, हे माझे वैयक्तिक मत आहे. गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये कोटा ठरवून आमदारांना घरे द्या. त्यांच्यासाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे व्यक्त केले. मुंबईमध्ये आमदारांसाठी ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात केली. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही प्रसारमाध्यमांनी आमदारांना विनामूल्य घरे देण्यात येणार आहेत, अशी वृत्ते प्रसिद्ध केली होती. त्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना घरे विकत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.