धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होऊया ! – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती
चिंचवड येथे हिंदु राष्ट्रजागृती सभेच्या निमित्ताने धर्मवीरांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा
चिंचवड (वार्ता.) – सध्या आपल्या देशामध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल जिहाद, धर्मांतर यांसारख्या धर्मांधांच्या षड्यंत्रामुळे हिंदु धर्माची कधीही भरून न निघणारी हानी होत आहे. हिंदूंनी स्वत: धर्माचरण करून हिंदूसंघटनाद्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्रकल्याण आणि विश्वकल्याण होणारच आहे, त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून स्वतःच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होऊया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीने चिंचवड जवळील मोई गावातील ‘ज्ञानेश्वरी आश्रम’ येथे २७ मार्च या दिवशी सायंकाळी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. नागेश जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि त्यासाठी करायच्या प्रयत्नांची दिशा’, या विषयावर मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र यांवर सध्या होणारे आघात, समाजाची एकंदरीत स्थिती आणि हिंदु महिला अन् युवती यांच्या असुरक्षिततेची भीषण स्थिती याविषयी उपस्थितांना अवगत करण्यात आले. श्री. नागेश जोशी पुढे म्हणाले की, हिंदूंवर आज विविध माध्यमांतून आघात होत आहे. राज्यघटनेत समानतेचे तत्त्व असले, तरी हिंदु धर्म शिकवण्यास आज प्रतिबंध आहे, तर अल्पसंख्यांकांना धार्मिक शिक्षणासाठी अनुदान दिले जाते. धर्मनिरपेक्षतेच्या नावावर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आणि बहुसंख्यांक हिंदूंवर अन्याय केला जात आहे. जगभरात ‘जिहाद’ने उच्छाद मांडलेला असल्याने हिंदूंनी त्याचा धोका ओळखून अखंड सावध राहिले पाहिजे. हिंदूंनी स्वत:च्या क्षमतेनुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी योगदान दिले पाहिजे. आज विश्वशांतीसाठी भारताकडे, भारतीय संस्कृतीकडे, आध्यात्मिक ज्ञानाकडे आणि सनातन हिंदु धर्माकडे संपूर्ण जग आशेने बघत आहे. हिंदूंनी धर्माचरण आणि शौर्यजागरणही केले पाहिजे.
सभेचा प्रारंभ ‘ज्ञानेश्वरी आश्रमा’चे मालक डॉ. बाबासाहेब कुटे यांनी शंखनाद करून केला. त्यानंतर श्री गणेशाच्या श्लोकाने सभेला प्रारंभ झाला. सभेचे सूत्रसंचालन सौ. गौरी येवले यांनी केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वी करण्यासाठी बहुमूल्य सहकार्य करणारे डॉ. बाबासाहेब कुटे यांचे हिंदु जनजागृती समितीने आभार मानले. या वेळी ‘हिंदु नववर्ष २ एप्रिल या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करा’, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
क्षणचित्रे
१. सभेचा प्रसार २ धर्मप्रेमींनी (श्री. कैलास कुटे आणि श्री. गोरख फलके) ३ दिवस केला.
२. संपूर्ण प्रसारात धर्मप्रेमी प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करत होते. तसेच प्रसारात प्रतिदिन १ घंटा नामजप एकत्रित करत होते.
३. सभेच्या दिवशी ४ धर्मप्रेमींनी ५० मिनिटे सामूहिक नामजप केला.
४. प्रत्यक्ष सभेच्या दिवशी जिज्ञासूंना दूरभाष करून आठवण करून दिली.
५. धर्मप्रेमी श्री. गोरख फलके यांच्या जवळच्या नातेवाइकांचे लग्न होते; पण त्यांनी सभेला प्राधान्य दिले.
६. देहूगाव येथील धर्मप्रेमी सहकुटुंब सभेला आले होते आणि ते सभेच्या सेवेत सहभागी झाले होते.
७. ‘ज्ञानेश्वरी आश्रमा’चे मालक डॉ. बाबासाहेब कुटे हे स्वतः सेवेमध्ये सहभागी झाले. सभेच्या शेवटी वारकरी संप्रदायाचा ‘नित्य नियम भजनी मालिका’ हा ग्रंथ ३ जणांना भेट दिला.
८. धर्मप्रेमी श्री. योगेश आढाव यांच्या पत्नीने बालसंस्कारवर्ग घेण्याची सिद्धता दर्शवली.
९. सभेला उपस्थित ‘श्री स्वामी समर्थ महाविद्यालया’चे मालक श्री. शिवाजी गवारे यांनी त्यांच्या विद्यालयात प्रशिक्षणवर्ग, तसेच समितीचे उपक्रम घेऊ शकता, असे सांगितले.
१०. सभा झाल्यावर अनेक युवतींनी आपण धर्मासाठी कसे योगदान देऊ शकतो ? हे जाणून घेतले.
११. सर्व धर्मप्रेमींनी सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेतली.