‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रांतर्गत धर्मांधांकडून हिंदु मुली आणि युवती यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या बातम्या
धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला पळवून नेल्याने पोलिसांत तक्रार करणार्या हिंदूंवर २०० धर्मांधांकडून आक्रमण
पोलिसांवरही दगडफेक
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात राज्यात कायदा करण्यात आला असला, तरी धर्मांधांवर त्याचा वचक बसलेला नाही. यासाठी कायद्यात अधिक कठोर शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे ! – संपादक
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील जुही कॉलनीमधील एका धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेल्याच्या घटनेनंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी अरबाज, शादाब आणि आलम या तिघांना अटक केली आहे. ही घटना २६ मार्चच्या रात्री घडली. पोलिसांनी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक विशाल बजरंगी यांच्या तक्रारीवरून एकूण १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या हाणामारीमध्ये विशाल, आकाश शुक्ला, सौरभ आणि संस्कार शर्मा हे तरुण घायाळ झाले. या तरुणांनी ‘धर्मांधांकडून सातत्याने आम्हाला धमक्या दिल्या जात असून आम्हाला संरक्षण देण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.
पोलिसांकडून धर्मांध तरुणावर कारवाई करण्यात आली नसल्याचा हिंदूंचा आरोप
हिंदु मुलीच्या नातेवाइकांनी या वेळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केले. त्यांनी आरोप केला की, पोलिसांनी धर्मांध तरुणाच्या विरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. (उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना पोलिसांकडून हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात अशी असंवेदनशीलता अपेक्षित नाही ! – संपादक) या आंदोलनानंतर ते घरी परतत असतांना २०० हून अधिक धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले. याची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तेथे पोचले आणि त्यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पोलीस तेथे पोचले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पोलीस धर्मांध तरुण आणि हिंदु तरुणी यांचा शोध घेत आहेत. सध्या येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लव्ह जिहादसाठी कुख्यात असलेली जुही कॉलनी !
जुही कॉलनीमध्ये ‘लव्ह जिहाद’ची घडलेली ही पहिलीच घटना नाही. वर्ष २०२० मध्ये येथे ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाकडून चौकशी करण्यात आली होती. तेव्हा या कॉलनीमधील ४ धर्मांध तरुणांची माहिती मिळाली होती. हे चौघे हिंदु तरुणींना लक्ष्य करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होते. यात अल्पवयीन मुलींचा समावेश असायचा. त्यांच्याविरुद्ध १४ वर्षांची मुलगी आणि एक १९ वर्षांची तरुणी यांना पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
एका प्रकरणात धर्मांध तरुणाने दलित युवतीला जाळ्यात ओढले, तर दुसर्या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर बलात्कार !
बरेली येथे ‘लव्ह जिहाद’च्या दोन घटना उघड
लव्ह जिहादला आणखी किती हिंदु मुली बळी पडल्यावर सरकार लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे ? असा प्रश्न हिंदूंना पडला आहे ! – संपादक
बरेली (उत्तरप्रदेश) – येथे ‘लव्ह जिहाद’च्या २ घटना समोर आल्या आहेत. दोन्ही घटनांतील आरोपींची नावे आसिफ अशीच आहेत. एका प्रकरणातील आसिफवर दलित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला पळवून नेल्याचा आरोप आहे, तर दुसर्या प्रकरणातील आसिफवर एका अल्पवयीन मुलीला स्वतः हिंदु असल्याचे आणि आकाश असे नाव असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याचा अन् तिचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. गेल्या एका वर्षापासून तो या मुलीच्या मागे होता. त्याने तिला देहली येथे नेऊन चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. एक दिवस ती आसिफच्या घरी गेल्यावर तो मुसलमान असल्याचे उघड झाले. तिने तिच्या कुटुंबियांना याविषयीची माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवला. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
नायगाव (पालघर) येथे मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणार्या मौलानाला लोकांनी चोपले !
|
वसई, २८ मार्च – नायगाव येथील मौलाना (इस्लामी विद्वान) नुरुल्ला अशरफ अली शेख (वय २४ वर्षीय) याने ७ वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. घटना समजल्यावर संतप्त नागरिकांनी मौलानाला विवस्त्र करून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याने त्याचा गुन्हा मान्य केला आहे. २७ मार्च या दिवशी सकाळी १० वाजता ही घटना घडली. पीडित मुलगी दुकानात सुट्टे पैसे मागण्यासाठी गेली होती. तेव्हा मौलानाने तिला पैशांचे आमीष दाखवून स्मशानभूमीत नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करून तेथून पळ काढल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्याद्वारे गुन्हा नोंदवला.