इम्रान खान यांच्या कार्यकाळात महागाईत ऐतिहासिक १५ टक्क्यांची वाढ !

  • पाकची आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल !

  • पाकच्या सौर्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह !

जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मात्या पाकने पुण्यभूमी भारताला सातत्याने त्रास दिला. पाकला त्याची फळे भोगावी लागत आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आधीच कंगाल झालेल्या पाकला वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि कर्जाचा डोंगर या समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आले आहे. त्याखेरीज आतंकवादाच्या घटनांतही प्रचंड वाढ झाली आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या कार्यकाळात सर्वच स्तरांवर पाकची दिशा अन् दशा अधिक बिकट होत गेली. पाकवरील चीनच्या कर्जाचा बोजा आता १.३७ लाख कोटी रुपयांवर जाऊन पोचला आहे. त्यामुळे पाकला काही भाग चीनला भाडेतत्त्वावर द्यावा लागल्याने त्याच्या सौर्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ सारख्या आतंकवादी संघटनांच्या समवेतचे पाक सरकारचे करार फिसकटले !

पाक सरकारने वर्ष २०१९ नंतर आतंकवाद्यांशी करार केले होते. त्यात कुख्यात ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेच्या समवेत करार करूनही या संघटनेने नोव्हेंबर २०२१ मध्ये पाकच्या १२ सैनिकांना ठार केले होते.

पाकमध्ये महागाईचा कहर आकड्यांमध्ये !

  • पाक रुपयाचे अवमूल्यन : १ अमेरिकी डॉलर म्हणजे तब्बल १७७ पाकिस्तानी रुपये; वर्ष २०१८ मध्ये हाच आकडा १२३ पाकिस्तानी रुपये इतका होता.
  • महागाई : ऐतिहासिक १५ टक्क्यांची वाढ झाली.
  • खाद्य सामग्री, पेट्रोलियम पदार्थांचे दर : १० टक्क्यांची वाढ झाली.
  • विदेशी कर्जाचा बोजा अडीच पटींनी वाढला : सध्या हा आकडा ६.४७ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे.
  • खाद्यतेलाचे मूल्य चौपट झाले : वर्ष २०१८ मध्ये पाकमध्ये खाद्य तेल १२५ रुपये लिटर एवढे होते. ते आता ५५० रुपये लिटर झाले आहे.
  • बेरोजगारीचा दर : पाकमध्ये बेरोजगारीचा दर ४.६५ टक्के झाला आहे. वर्ष २०१८ मध्ये इम्रान खान यांनी १ कोटी लोकांना नोकर्‍यांच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात ही संख्या जेमतेम ५० सहस्र इतकीच आहे.