‘विनाअनुदानित शाळा कृती समिती’चा इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर पडताळणीवर बहिष्कार !
मुंबई – विनाअनुदानित शाळा कृती समिती’ने इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षेच्या पेपर पडताळणीवर बहिष्कार टाकला आहे. विनाअनुदानित शाळांसाठी १०० टक्के अनुदान मिळावे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना सेवा संरक्षण मिळावे, या मागण्यांसाठी हा बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे विनाअनुदानित शाळांमध्ये उत्तरपत्रिका पडून आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत पेपर पडताळणीसाठी शिक्षकांनी नकार दिला आहे. राज्यातील साडेसहा सहस्र शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे पडताळणीविना पडून आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये संघटनेने चेतावणी दिली होती; मात्र त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्याने शिक्षक बहिष्कारावर ठाम आहेत.