मारियूपोल (युक्रेन) येथे उद्याने, मैदाने आणि घरांचे अंगण येथे पुरले जात आहेत मृतदेह !
कीव्ह (युक्रेन) – रशियाच्या आक्रमणात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनच्या मारियूपोल शहरात मृतदेह स्मशानभूमीत नेणे कठीण झाल्यामुळे ते उद्याने, खेळाची मैदाने आणि घरांचे अंगण येथे पुरण्यात येत आहेत. रशियाच्या आक्रणामुळे संपर्क यंत्रणा नष्ट झाल्याने इतर देशांत रहाणारे लोक त्यांच्या युक्रेनमधील नातेवाइकांची माहिती घेऊ शकत नाहीत. युक्रेनमध्ये काम करणारे लोक मृत्यूमुखी पडलेल्यांची, तसेच देश सोडून जाणार्यांच्या नावाची सूची सामाजिक माध्यमांवरून घोषित करू लागले आहेत. अनेक मृतांच्या नातेवाइकांना मृत्यू पावलेल्या त्यांच्या संबंधितांची माहिती कबरीच्या छायाचित्रांवरून करून घ्यावी लागत आहे.
"There are very many dead, and nobody is a position to count them."https://t.co/mK91PCwKf8
— Radio Free Europe/Radio Liberty (@RFERL) March 26, 2022
मारियूपोलमधून बहुतांश लोकांना बाहेर पडण्याची इच्छा आहे. तथापि साहाय्याविना बाहेर पडणे त्यांना शक्य होत नाही; कारण वाहन चालवण्यासाठी चालकच उपलब्ध नाही. स्थलांतरासाठी साहाय्य करणार्या संस्थेने १०० वाहनचालकांना साहाय्य करण्याचे आवाहन केले होते; परंतु प्रत्यक्षात त्यांना ३० चालकच उपलब्ध झाले.