नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्यासाठी व्यापक जनजागृती !
हिंदु जनजागृती समिती गेली २० वर्षे नववर्ष हे ख्रिस्ती प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला साजरे करण्यासाठी भारतभरातील जनतेचे प्रबोधन करत आहेत. या प्रबोधनामध्ये पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देणे, प्रबोधन बैठका घेणे, जनजागृतीपर व्याख्याने घेणे, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये लेख देणे अशा प्रकारे जागृती करण्यात येत आहे. या प्रबोधनाला आता व्यापक स्वरूप मिळून धर्मप्रेमी स्वयंस्फूर्तीने एकमेकांना त्यासाठी आवाहन करत आहेत. ‘व्हॉट्सॲप स्टेट्स’ (‘व्हॉट्सॲप’ या सामाजिक माध्यमामध्ये इतरांना पहाता येण्यासाठी चित्र अथवा व्हिडिओ ठेवण्याची केलेली सुविधा), फेसबूकवर नववर्ष शास्त्रानुसार साजरे करण्याचे लिखाण करणे, ३१ डिसेंबरविरोधी कविता बनवून प्रसारित करणे इत्यादी विविध प्रकारे हिंदूंनी जागृती केली.
हिंदु जनजागृती समितीकडून वर्ष २०२१ मध्ये ३१ डिसेंबरविरोधी करण्यात आलेल्या जनजागृतीची संख्यात्मक माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. ३१ डिसेंबरविरोधी निवेदने
भारतभरात एकूण १ सहस्र ९८९ एवढी निवेदने देण्यात आली. त्यांपैकी १ सहस्र १५ शाळांमध्ये, ३६२ निवेदने प्रशासनाला, ३५६ महाविद्यालयांमध्ये, २५६ ठिकाणी लोकप्रतिनिधींसह अन्यांना देण्यात आली. या निवेदनामध्ये ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे केल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि हिंदु संस्कृतीनुसार ते गुढीपाडव्याला साजरे करण्याचे लाभ यांविषयी माहिती देऊन संबंधितांना भारतीय संस्कृतीचे पालन करण्याचे आवाहन केले.
२. जनजागृतीपर बैठका
समाजात जनजागृतीपर एकूण ८७ बैठका घेण्यात आल्या आणि त्यांना १ सहस्र ८१२ एवढी उपस्थिती होती. या बैठकांमधून ३१ डिसेंबरचे तोटे समाजाला समजावून सांगता आले. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांनी ख्रिस्ती नववर्ष साजरे करायचे टाळले.
३. प्रबोधनात्मक विषय सांगणे / व्याख्याने घेणे
एकूण ४५७ जागी प्रबोधनात्मक विषय सांगण्यात आला. या व्याख्यानांना एकूण २० सहस्र ३८६ धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
४. हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग
हिंदु जनजागृती समितीच्या अभियानात भारतभरातील एकूण ५५७ हिंदुत्वनिष्ठ हे प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांना निवेदने देणे, बैठका, व्याख्याने यांचे आयोजन करणे या माध्यमांतून सहभागी झाले.
५. फलकलेखन
३१ डिसेंबरचा फोलपणा उघड करणार्या आणि गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणार्या फलकांचे लिखाण एकूण १ सहस्र ४०६ जागी करण्यात आले.
६. प्रसिद्धीमाध्यमांतील लेखांतून प्रबोधन
दैनिक, साप्ताहिक, मासिके, तसेच ऑनलाईन प्रसिद्धीमाध्यमे यांना एकूण ३०० हून अधिक ठिकाणी लेख पाठवण्यात आले. त्यांना बहुतांश ठिकाणी प्रसिद्धी मिळाली.
७. जिल्ह्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद
अ. सोलापूर येथे ३ केबलवरून व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यांची दर्शक संख्या साडेबारा लाख आहे.
आ. समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील एका धर्माभिमान्याने शाळा आणि महाविद्यालये येथे मिळून ९ निवेदने दिली. तसेच त्यांनी त्यांच्या शाळेतील मुलांकडून ‘नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करणार’, अशा आशयाची प्रतिज्ञा म्हणून घेतली.
इ. ठाणे येथे एका केबल वाहिनीवर व्हिडिओ दाखवला. त्यांची दर्शकसंख्या ८० सहस्र आहे.
ई. सातारा येथे ३१ डिसेंबरविरोधी अभियानानिमित्त ५६ भित्तीपत्रके लावण्यात आली.
उ. धुळे येथे केबलवरून प्रबोधनात्मक ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आले. त्यांची दर्शकसंख्या १४ लाख आहे. तसेच येथील रिक्शांच्या मागे ५० प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले.
ऊ. पुणे येथे रिक्शा आणि अन्य ठिकाणी ५०० प्रबोधन पत्रके चिकटवण्यात आली.
🌸 गुढीपाडव्याचे महत्त्व (२.४.२०२२) – वार्षिक प्रलय संपून नवनिर्मितीला आरंभ होण्याचा दिवस ! 🌸
एक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.
अधिक माहितीसाठी भेट द्या: https://t.co/hOkGOH2iB5#Gudipadva #Marathi #Hindu pic.twitter.com/3tOS0AVe2V
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) March 27, 2022
८. गुढी उभारण्याची प्रात्यक्षिके दाखवणे
हिंदु जनजागृती समितीकडून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये गुढी उभारण्याची प्रात्यक्षिके दाखवली. ही प्रात्यक्षिके पाहून हिंदूंनी ‘धर्मशास्त्रानुसार गुढी कशी उभारावी ?, हे आम्हाला समजले आणि त्याप्रमाणे आम्ही गुढी उभारू’, असे सांगितले.
८ अ. सामूहिक गुढी उभारणे
हिंदु जनजागृती समिती आणि कोल्हापूरसह काही ठिकाणच्या ग्रामस्थांच्या पुढाकाराने त्या त्या गावी सामूहिक गुढी उभारण्यात आली. यातून हिंदु नववर्षानिमित्त हिंदूंचे संघटन झाले.
८ आ. गुढीपाडव्याचा विरोध करणार्या चर्चासत्रांत सहभाग
महाराष्ट्रातील एक कथित पुरोगामी आणि धर्मद्रोही संघटना गुढीपाडवा अन् छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान यांचा संबंध दाखवून समाजात दुही माजवते. त्यामधून अनैतिहासिक दावा करून गुढीपाडवा साजरा न करण्याचे आवाहन करत असते. याविषयीच्या एका वाहिनीवरील चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांनी सहभागी होऊन त्या संघटनेच्या सूत्रांना खोडून काढून महाराष्ट्रातील जनतेला मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करण्याचे आवाहन केले.
– श्री. सागर चोपदार, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मुंबई.