यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार अमरनाथ यात्रा !
३० जूनपासून ११ ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा !
नवी देहली – गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे स्थगित ठेवण्यात आलेली अमरनाथ यात्रा यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार आहे. या यात्रेतील भाविकांना कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.
After having remained suspended for two years due to #Covid pandemic, a 43-day #amarnathyatra to South #Kashmir #Himalayas will begin in the UT on June 30.https://t.co/hxXXU798W3
— The Indian Express (@IndianExpress) March 27, 2022
जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार परंपरेनुसार ही यात्रा ३० जूनपासून प्रारंभ होऊन रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत, म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे.