पुण्यातील शनिवारवाड्याची स्वच्छता ‘क्रिएटिव्ह फाऊंडेशन’ला देण्याची मागणी !
पुणे – केंद्रीय पुरातत्व विभागाकडून शनिवारवाड्याची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूमध्ये कचर्याचे आणि असुविधांचे जाळे निर्माण होत आहे. वाड्यातील सर्व माहिती फलक अस्पष्ट आहेत. कारंज्यामध्ये घाण साचलेली आहे. (अकार्यक्षम पुरातत्त्व विभाग ! – संपादक) वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत, तसेच ‘लाईट अँड साऊंड शो’ही बंद आहे. तरीही वाड्यात जाण्यासाठी माणसी २५ रुपये शुल्क आकारले जाते. केंद्रीय पुरातत्व विभागाने शनिवारवाड्याची स्वच्छता आणि देखभाल करण्याचे दायित्व आमच्याकडे द्यावे, अशी मागणी ‘क्रिएटिव्ह फाऊंडेशन’चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांच्याकडे केली आहे.