घरीही अनुभवायला न मिळणारा प्रेमभाव रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांच्या माध्यमातून अनुभवायला मिळणे
‘मागील मासात मला बरे नव्हते. एके दिवशी मध्यरात्री १ वाजता मला जुलाब होत होते. वैद्यांकडून औषध घेतले, तरीही माझ्या पोटात दुखत होते आणि ‘जुलाब होणार’, असे मला वाटत होते. मला सोयीचे जावे; म्हणून मी भोजनकक्षाजवळ असलेल्या प्रसाधनगृहाजवळ बसलो होतो. मध्यरात्री कु. वैष्णवी गुरव तिच्या खोलीत जात होती. तिने माझी विचारपूस केली आणि मला म्हणाली, ‘‘काका, काळजी घ्या आणि काही साहाय्य लागल्यास लगेच मला संपर्क करा.’’ तिचे बोलणे ऐकून मला भरून आले. ती सेवा करून झोपायला जात होती, तरीही तिची मला साहाय्य करण्याची सिद्धता होती.
या प्रसंगात मला तीव्रतेने जाणीव झाली, ‘मी घरी असतो, तरीही माझी अशी काळजी घेतली गेली नसती.’ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असे साधक सिद्ध केले आहेत’, याबद्दल मला कृतज्ञता वाटली आणि ‘या साधकांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते’, अशी माझी निश्चिती झाली.’
– श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |