गडकिल्ल्यांवरील मद्यपान आणि अस्वच्छता यांच्या विरोधातील ‘पोस्ट’मध्ये इतिहासाचा विपर्यास !

  • धर्मांधांऐवजी प्लास्टिक आणि मद्यपी यांना ‘स्वराज्या’चे शत्रू दाखवण्याचा प्रयत्न !
  • अशा ‘पोस्ट’द्वारे ‘धर्मांधांची क्रूरता झाकण्यासाठी समाजाला भ्रमित करण्याचा हा प्रयत्न नाही ना ?’, याचा शोध घ्यायला हवा !

मुंबई, २७ मार्च (वार्ता.) – ‘फेसबूक’द्वारे गडांवर प्लास्टिकचा कचरा न करणे आणि गडांवर मद्यपान करू नये, यांविषयी प्रबोधन करणार्‍या एका ‘पोस्ट’मध्ये (संदेशामध्ये) इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये प्लास्टिकचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या यांना अफझलखान आणि शाहिस्तेखान यांच्या रूपात प्रतिकात्मक दाखवून ‘स्वराज्याचा खरा शत्रू अफझलखान नव्हे; तर प्लास्टिकची घाण’, ‘स्वराज्याचा खरा शत्रू शाहिस्तेखान नव्हे; तर दारुड्यांची घाण’, असे लिहिण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये ‘त्यात भरीस भर म्हणजे काहींची चक्क दारू ढोसायला किल्ल्यांवर जाण्याची हिम्मत होते. त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धुळीस मिळवले जात आहे. पर्यावरण आणि इतिहास यांचे साक्षीदार बना, हत्यारे नाही’, असे लिखाण करण्यात आले आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रातील भयावह स्थितीचे वर्णन करण्यासाठी ‘भूमीत गाढवाचा नांगर फिरवण्यात आला’, असे वर्णन केले जाते. यावरून मोगलांच्या अत्याचाराची भयावहता लक्षात येते. गडदुर्गांवर प्लास्टिक टाकणे आणि मद्यपान करणे चुकीचेच आहे. त्यासाठी प्रबोधन करणेही अभिनंदनीय आहे; मात्र ‘अफझलखान आणि शाहिस्तेखान हे स्वराज्याचे खरे शत्रू नाहीत’, असे म्हणणे हा इतिहासाचा विपर्यास आहे. ज्याला शिवरायांच्या पराक्रमाची आणि धर्मांधांनी महाराष्ट्रावर केलेल्या अत्याचारांची जाण नाही, तोच असे लिखाण करू शकतो ! – संपादक)