हिंदी मालिकेतील अभिनेत्री अनघा भोसले यांचा मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय !
आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय !
किती हिंदु अभिनेत्री असा उदात्त हेतू ठेवून मायेचा त्याग करून अध्यात्माच्या मार्गावर चालतात ? – संपादक
मुंबई – ‘अनुपमा’ या मालिकेमध्ये नंदिनीची भूमिका साकारणार्या अभिनेत्री अनघा भोसले यांनी मनोरंजन सृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिने सामाजिक संकेतस्थळावर एका ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे, ‘‘मी अधिकृतपणे चित्रपट आणि दूरदर्शन उद्योग सोडत आहे. माझ्या धार्मिक श्रद्धेमुळे मी आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.
Anupamaa actress Anagha Bhosale quits ‘film and TV industry’ for religious beliefshttps://t.co/4p4T6YA3yz
— Newsroom Post (@NewsroomPostCom) March 26, 2022
लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की, मानव जन्म हा देवाची सेवा आणि प्रेम करण्यासाठी, तसेच कृष्णाचा आत्मा पसरवण्यासाठी आहे. जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे योग्य आहे.’’ अनघा भोसले यांच्याप्रमाणेच सना खान आणि झायरा वसीम यांसारख्या अभिनेत्रींनीही धार्मिक कारण देत मनोरंजन सृष्टी सोडली होती.