पुण्यातील एका शाळेतील स्वच्छतागृहात ११ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला अटक !
शाळेतील सुरक्षारक्षकच मुलींवर अत्याचार करत असतील, तर मुली सुरक्षित कशा रहाणार ? शाळेने याचा गांभीर्याने विचार करून सुरक्षारक्षकाला कठोर शिक्षा करणे अपेक्षित आहे ! – संपादक
पुणे – येथील शिवाजीनगर परिसरातील ‘गर्ल्स हायस्कूल’च्या स्वच्छतागृहात २३ मार्च या दिवशी एका ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणातील अन्वेषण अधिक वेगाने करत अवघ्या २४ तासांच्या आत गुन्हेगाराला अटक केली आहे. तो शाळेचा सुरक्षारक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
#UPDATE | A 36-year-old man arrested by Pune Police in connection with the sexual abuse of an 11-year-old girl at her school’s toilet in Pune.#Maharashtra
— ANI (@ANI) March 24, 2022
अटक करण्यात आलेला सुरक्षारक्षक मंगेश हा पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत होता. या शाळेत सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यावरून पोलिसांना आरोपीविषयी माहिती मिळाली.