‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’च्या वतीने पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज यांची स्वच्छता !
पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर) – ३५० वर्षांपासून इतिहासाचा साक्षीदार असणार्या पन्हाळगडावरील तटबंदी आणि बुरुज येथे पुष्कळ प्रमाणात झाडीझुडपे वाढलेली होती. ‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ने दुर्गसंवर्धन मोहीम घेतली.
यामध्ये सहभागी शिवभक्तांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे पन्हाळगडावरील तटबंदी, बुरुज स्वच्छ झाले आहेत.
‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’ गेल्या ३० वर्षांपासून इतिहासाच्या क्षेत्रात दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. ‘शिवराष्ट्र’चे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी मोहिमेचे महत्त्व विशद केले. मोहीम प्रमुख राजेंद्र पोवार यांनी ‘संवर्धन मोहिमे’विषयी मार्गदर्शन केले. मोहीम प्रमुख श्रेयस भंडारी, अभिजित पवार, गणेश कदम, विनायक जरांडे, अमित पोरलेकर, सुनील जाधव, अमर पाटील, प्रतीक लिगडे यांनी या मोहिमेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.