अर्पणदात्यांनो, सनातनचे साधक असल्याचे भासवून दिशाभूल करणार्यांपासून सावध रहा !
सनातनच्या अध्यात्मप्रसार कार्याचा अपलाभ घेण्यासाठी काही लोक सनातनच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि अर्पणदात्यांशी ओळख अन् जवळीक करून त्याचा दुरुपयोग करत असतात. अशाच प्रकारे पूर्वी सनातनच्या प्रसारकार्यात सहभागी असणारे; मात्र मागील काही वर्षांपासून अन्य संप्रदायात सक्रीय झालेले काही लोक सनातनच्या अर्पणदात्यांकडून अन्य कारणांसाठी पैसे गोळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सनातनच्या नावाचा दुरुपयोग करणार्यांना आळा घालण्यासाठी अर्पणदात्यांनी त्यांच्याकडे अर्पण मागण्यासाठी येणार्या सनातनच्या साधकांकडे अर्पणाची छापील पावतीपुस्तके आहेत कि नाही हे पाहून अर्पण द्यावे आणि त्यांच्याकडून पावती मागून घ्यावी. अर्पण मागण्यासाठी येणार्या व्यक्तीविषयी काही संशयास्पद आढळल्यास आपल्याला परिचित असलेल्या सनातनच्या स्थानिक साधकाशी संपर्क साधावा. ते शक्य नसल्यास रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या कार्यालयात खालील क्रमांकावर कळवावे.
संपर्क : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’