वेल्लोर (तमिळनाडू) येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार
५ आरोपींना अटक !
अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक
वेल्लोर (तमिळनाडू) – येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या घटनेवरून राज्याच्या विधानसभेतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. ही महिला रात्री तिच्या मित्रासवमेत चित्रपट पहाण्यास गेली होती. चित्रपट संपल्यानंतर ते दोघे ६ आसनी रिक्शातून घरी जात होते. या रिक्शात आधीपासून ४ जण बसले होते. रिक्शाचालक त्यांना एका निमर्नुष्य ठिकाणी घेऊन गेला. तेथे रिक्शातील चार जणांनी महिलेच्या मित्राला मारहाण केली, तसेच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या वेळी तिच्याकडील ४० सहस्र रुपये आणि सोनसाखळी आरोपींनी चोरले. ही महिला बिहार येथील रहाणारी आहे. घटनेनंतर ती पुन्हा बिहार येथे गेली असून तिने ऑनलाईन गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी ५ जणांना अटक केली.