आशासेविकांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – जुलै २०२२ पासून राज्यातील आशासेविकांच्या मानधनात ५०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे, तसेच राज्यस्तरावर सर्वोत्तम काम करणार्या आशासेविकेला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २५ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आशासेविकांना सेवेत कायम करण्याची मागणी करण्याविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सना 1 लाख प्रोत्साहनपर पारितोषिक#maharashtrajanbhumi #AshaWorkers
— MaharashtrajanbhumiNews (@MaharashtrajanB) March 26, 2022
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘कोरोनाकाळात आशासेविकांनी केलेले काम लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत आहे. यापुढे जिल्हास्तरावर चांगले काम करणार्या आशाप्रवर्तकाला ५० सहस्र रुपये, तर आशासेविकेला ३० सहस्र रुपये पारितोषिक देण्यात येईल. यांसह राज्यस्तरावर चांगले काम करणार्या आशाप्रवर्तकाला १ लाख, तर आशासेविकेला ७५ सहस्र रुपये पारितोषिक देण्यात येईल.’’