संतांमधील चैतन्याचा लाभ होण्यासाठी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत असणे
परात्पर गुरु डॉक्टर निर्गुण स्थितीला असल्याने त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून शांती जाणवणे; पण त्यांच्या चरणांतून मात्र चैतन्य प्रक्षेपित होत असणे आणि म्हणूनच संतांमधील चैतन्याचा लाभ होण्यासाठी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत असणे
‘परात्पर गुरु डॉक्टर उभे असलेले एक छायाचित्र होते. ‘त्या छायाचित्राकडे पाहून काय जाणवते ?’, याचा प्रयोग करण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सांगितले. तो करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या तोंडवळ्याकडे बघितल्यावर शांती जाणवली; पण त्यांच्या चरणांकडे बघितल्यावर ‘त्यांतून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. यावरून लक्षात आले, ‘परात्पर गुरु डॉक्टर हे त्यांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे निर्गुण स्थितीला आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला शांती जाणवली. असे असले, तरी त्यांच्या चरणांतून चैतन्याचे प्रक्षेपण सातत्याने होत असते. ‘संतांमधील चैतन्याचा लाभ होण्यासाठी त्यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार करण्याची पद्धत आहे’, हे परात्पर गुरु डॉक्टरांनी या प्रयोगातून माझ्या लक्षात आणून दिले. यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.१२.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |