६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) या दैवी बालिकेच्या लिखाणाच्या वह्यांच्या संशोधनातून उलगडलेली तिची गुणवैशिष्ट्ये

दैवी बालकांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. अपाला औंधकर ही लिखाण करत असलेल्या ४ वह्यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून संशोधन करण्यात आले. त्या वह्यांची निरीक्षणे आणि त्या माध्यमातून कु. अपालाची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. अपाला औंधकर

१. कु. अपाला औंधकर यांच्या वह्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप १ – या वहीला दैवी गंध येतो. आश्रमात झालेल्या विविध यागांच्या वेळी कु. अपाला यांना आलेल्या अनुभूती वहीतील शेवटच्या काही पानांवर लिहिल्या आहेत.
टीप २ – वही क्र. २ आणि ३ यांनाही गंध येतो. वही क्र. २ मधील शेवटच्या २-३ पानांवर ‘गुरुदेवांकडून शिकायला मिळालेली सूत्रे’ असे उत्स्फूर्तपणे मिळालेले ज्ञान आहे. या वहीत मुद्रा अभ्यासाच्या संदर्भात विस्तृत स्वरूपात लिखाण केलेले आहे.
टीप ३ – या वहीतील ८ पानांवर अपाला यांना उत्स्फूर्तपणे ‘अडवू’ नृत्यातील मूळ हालचाली याविषयी मिळालेले ज्ञान आहे. हे ज्ञान घेतांना अपाला यांना अखंड शांती, चैतन्य आणि शिवतत्त्व अनुभवता आले. ‘या वहीला गंध येतोच; पण त्या ८ पानांना जास्त गंध येतो, असे जाणवले’, असे अपाला यांनी सांगितले.
टीप ४ – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही. – सौ. मधुरा कर्वे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


कु. अपाला औंधकर हिने नृत्याविषयी मिळालेल्या ज्ञानाचे केलेले लिखाण

२. वह्यांची निरीक्षणे पाहिल्यावर कु. अपाला यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली उत्तरे

प्रश्न १ अ. ‘हे गुरुदेवा, या चारही वह्यांमध्ये जास्त नकारात्मकता आली आणि अल्प प्रमाणात सकारात्मकता आहे. माझे लिहिण्यात काही चुकले का ?

उत्तर : नाही

आ. प्रश्न : आक्रमण झाले का ?

उत्तर : नाही

इ. प्रश्न : हे अनिष्ट शक्तींनी दिलेले ज्ञान आहे का? हे लक्षात आले नाही.

उत्तर : नाही

प्रश्न २ : मुद्राभ्यासाच्या वेळी जे काही अनुभवले आहे, ते अनुभवतांना मला पुष्कळ चांगले वाटले; परंतु त्याचे रिडींग (निरीक्षणे) नकारात्मक आले. त्याचे कारण मला समजले नाही.

उत्तर : वह्यांतील लिखाणावर आलेल्या आवरणामुळे नकारात्मक ऊर्जा जाणवते.

प्रश्न ३ : वह्यांना सुगंध येतो; परंतु तरीही नकारात्मकता आली, तर त्यातील अभ्यास चुकला आहे का ?

उत्तर : नाही

प्रश्न ४ : गुरुदेवा, मुद्राभ्यास करतांना आता कसे प्रयत्न करू ?

उत्तर : प्रयत्न योग्य प्रकारे चालू आहेत.

हे गुरुदेवा, काहीही परिणाम असो, तुम्ही मला यातून शिकवतच आहात. या वह्यांच्या माध्यमातून शिकवल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.१२.२०२१)

सौ. मधुरा कर्वे

३. कु. अपाला औंधकर यांच्या लिखाणाच्या वह्या पहातांना आणि तिच्याशी बोलतांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘एखाद्या साधकाची किंवा त्याच्या वस्तूंची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे नकारात्मक आल्यास त्या साधकाच्या मनात स्वतःबद्दल नकारात्मक विचार येतात, त्याला मानसिक त्रास होतो किंवा विकल्पही येतात. याउलट कु. अपाला हिला तिच्या लिखाणातील वह्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळल्याचे लक्षात आल्यावर तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेल्या प्रश्नांतून तिच्यातील जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती आणि परात्पर गुरु डॉक्टरांवरील अपार श्रद्धा, हे गुण शिकायला मिळाले. सदर चाचणीच्या वेळी माझे अपालाशी बोलणे झाले. तेव्हा तिच्यामध्ये पुष्कळ नम्रता जाणवली. ‘तिचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटले. अपालाच्या वह्यांतील लिखाणाकडे पाहून आनंद जाणवत होता. तिचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. तिच्या लिखाणात कुठेही खाडाखोड नाही. तिचे प्रत्येक सूत्र अतिशय नीटनेटके लिहिलेले आहे. या चाचणीच्या निमित्ताने अपाला या दैवी बालिकेतील गुण मला शिकायला मिळाले. हे गुरुदेवा, कु. अपालासारखे गुण माझ्यातही येऊ देत, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना !’

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.१.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक